सबसिडीसाठी पुन्हा बंधनकारक करणार आधार कार्ड

aadhar
नवी दिल्ली : सरकार आधारशी संलग्न बँक खात्यात योजनेचा लाभ हस्तांतरित करण्याची योजना पुन्हा सुरू करण्यावर विचार करीत असून या योजनेचा उद्देश बनावट लाभार्थी ओळखणे सोयीचे व्हावे आणि योजनेचा थेट लाभार्थ्यांना फायदा मिळवून देणे हा आहे.

याबाबत आधारशी संलग्न डीबीटी योजना सरकार पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे. यासाठी योजना क्षमता जाणून घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

केंद्रीय नियोजन आयोग व भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात युआयडीएआय यांच्यामार्फत संयुक्तपणे याबाबत एक अहवाल तयार केला जात आहे.

युआयडीएआयमार्फतच आधार योजनेचे कार्यान्वयन होते. युआयडीएआय आणि आयोगाचे वरिष्ठ अधिकारी देशभरात ३०० जिल्ह्यांमध्ये जाऊन या योजनेच्या प्रभावाचा अभ्यास करीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

आयोगाला या ३०० जिल्ह्यांमध्ये केलेल्या अभ्यासाद्वारे १५ आॅगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

काही घटकांकडून याबाबत नाराजीचा सूर व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही योजना अंशत: बंद केली. निवडणूक जिंकण्यासाठी सरकारने ‘गेम चेंजर’ म्हणून ही योजना जाहीर केली; मात्र सरकारला याचा पुरेपूर लाभ उठवता आला नाही. विशेषत: विद्यार्थी वर्गाकडून या योजनेचे मोठे स्वागत करण्यात आले.

Leave a Comment