संघ परिवाराला ‘दक्ष’ रहाण्याचे आवाहन

bhagwat
नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच घवघवीत यश मिळविण्यासाठी संघ परिवारातल्या सर्व संघटनांनी दक्ष रहावे, असे आवाहन केले आहे.

नागपूर येथे नुकतीच संघ परिवारातल्या सर्व संघटनांच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना भागवत बोलत होते. आगामी काळ भारतीय जनता पक्षाचा हा परिक्षेचा आहे. त्यात नापास होता कामा नये, त्यासाठी संघ परिवारातल्या सर्व संघटनांनी दक्ष राहिले पाहिजे. आपले स्वतंत्र आस्तित्व असतानाही अनेक महत्वाच्या विषयावर सर्व संघटनांनी एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षाही भागवत यांनी व्यक्त केली.

हिंदुत्वाच्या मुद्यावर आधारित युती कायम रहावी, असे मतही काही नेत्यांनी या बैठकीत व्यक्त केली. या बैठकीला भाजपाचे अनेक मंत्री, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेते उपस्थि होते.

Leave a Comment