एल जीचा नवा ‘जी थ्री’ लाँच

lg
मुंबई – एलजी या कंपनीने ‘एलजी जी थ्री’ हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. १६ जीबी आणि ३२ जीबी या दोन पर्यांयामध्ये हा फोन उपलब्ध आहे. स्मार्टफोन सोबतच एलजीने जी वॉचही लाँच केले आहे. या घडाळ्याची किंमत कंपनीने १४ हजार ९९९ इतकी ठेवली आहे.

यासोबतच कंपनीने अमिताभ बच्चन यांची स्वाक्षरी असलेले १५ हजार फोन विक्रीसाठी ठेवले आहेत. तसेच नशीबान विजेत्यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधीही मिळू शकते असे कंपनीने सांगितले आहे.

एलजी जी थ्री (१६ जीबी) » ५.५ इंचाचा डिस्प्ले » १६ जीबी इंटरनल मेमरी » २.४ गिगाहर्टझ क्वाड कोर क्वालम्न स्नॅपड्रॅगन ८०१ प्रोसेसर » दोन जीबी रॅम » १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा » २.१ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » अँड्रॉईड ४.४ किटकॅट » किंमत – ४७ हजार ९९०

एलजी जी थ्री(३२ जीबी) » ५.५ इंचाचा डिस्प्ले » ३२ जीबी इंटरनल मेमरी » २.४ गिगाहर्टझ क्वाड कोर क्वालम्न स्नॅपड्रॅगन ८०१ प्रोसेसर » तीन जीबी रॅम » १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा » २.१ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » अँड्रॉईड ४.४ किटकॅट » किंमत- ५० हजार ९९०

Leave a Comment