पुणे स्फोटातील दहशतवादी बनावट असल्याचे उघड

puneblast
पुणे- पुण्यात १० जुलै रोजी फरासखाना पोलिस चौकीच्या आवारात झालेल्या दुचाकीतील बॉम्बस्फोटात पोलिसांपुढे हजर झालेला बशीर अहमद गोगलू हा काश्मीरी तरूण बनावट दहशतवादी असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. गोगलू हा अतिरेकी नाही मात्र मित्रांवर सूड उगविण्यासाठी त्याने हा स्फोट आपणच केल्याचे व त्यात तीन मित्रांनी मदत केल्याचे खोटेच पोलिसांना सांगितले होते.

काश्मीरच्या बारामुल्ला भागातील रहिवासी गोगलूने त्याच्या मित्रांकडून कांही रक्कम उसनी घेतली होती. हे मित्र त्याला पैसे परत मागत होते म्हणून त्यांना पोलिसांच्या कचाट्यात अडकविण्यासाठी त्याने हे नाटक केल्याचे समजते. गोगलू जेव्हा स्वतःहून पोलिसांपुढे हजर झाला व बॉम्ब स्फोट आपणच घडविल्याची कबुली दिली तेव्हा पोलिस आश्चर्यचकीत झाले मात्र त्याचवेळी पोलिसांना कांही शंकाही आल्या. त्यानुसार त्यांनी अधिक तपास केला तेव्हा गोगलूचा खोटेपणा उघडकीस आला असे समजते.

Leave a Comment