13 आखाड्यांच्या प्रमुखांनी धुडकावला साईपूजेचा विरोध

saibaba
शिर्डी – देशातील 13 आखाड्यांच्या प्रमुखांनी साईपूजेला शंकराचार्यांनी केलेला विरोध धुडकावून लावला. शंकराचार्यांनी साईबाबांबद्दल चुकीचे उद्गार काढून समाज तोडण्याचे काम केले आहे. त्यांच्याकडे जनतेने लक्ष देऊ नये. भक्तांनी साईसेवा सुरूच ठेवावी, असे आवाहन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते स्वामी बाबा हटयोगी व कल्की पीठाधीश्वर स्वामी प्रमोद कृष्णन यांनी केले.

शंकराचार्यांच्या विधानासंदर्भात वस्तुस्थिती जाणून आखाडा प्रमुखांनी घेण्यासाठी शिर्डी येथे समिती पाठविली. त्या समितीने सुमारे दोन तास साई मंदिरातील सर्व धार्मिक पद्धती, पूजा, आरती याबाबत माहिती घेतली. याबाबत ते म्हणाले, साईबाबांबद्दल शंकराचार्यांनी वादग्रस्त विधाने केल्याने देशभरात वाद निर्माण झाला. त्यामुळे वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्हाला पाठविले आहे. आज आम्ही शिर्डीतील साई मंदिरामधील पूजा पद्धती, आरत्या पाहिल्या. त्यात आम्हाला काहीही चुकीचे आढळले नाही. सनातन संस्कृतीचे जतन होत असल्याचे त्यातून आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शंकराचार्यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असे ते म्हणाले.

Leave a Comment