येत्या 24 जुलैला शिष्यवृत्तीचा निकाल

scholarship
पुणे – परिषदेचे आयुक्त व्ही. बी. पायमल यांनी येत्या 24 जुलै रोजी दुपारी 3 वाजता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल ऑनलाईन जाहीर होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली.

23 मार्च रोजी परीक्षा विभागाच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती. इयत्ता चौथीचे 8 लाख 90 हजार 77 विद्यार्थी तर, इयत्ता सातवीचे 6 लाख 77 हजार 941 विद्यार्थी या परीक्षेला बसले असून राज्यातील 9 हजार 89 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा अंतरिम निकाल 9 जून रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकालावर आक्षेप नोंदविण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. परीक्षेचा निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे, असे पायमल यांनी सांगितले.