आयडिया सेल्युलर मिळणार बँकिंग परवाना !

idea
मुंबई – नवीन बँकिंग परवाने देण्यासंदर्भात भारतीय रिजर्व्ह बँकेने (आरबीआय) पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून या संदर्भात सुपर मार्केट चेन डी मार्ट आणि दूरसंचार कंपनी आयडिया सेल्युलर यासारख्या कंपन्यांना बँक परवाने देण्यासंबंधीचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे आर्थिक क्षेत्रातील प्रगती साध्य करण्यास केंद्र सरकारला मदत मिळणार आहे.

विशेषत: मुथ्थुट फायनान्स आणि श्रीराम कॅपिटल लिमिटेड सारख्या सोनेतारण कर्ज देणाऱ्या कंपन्यांना शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करूनही बँकिंग परवाने मिळविण्यात अपयश आले होते. मात्र आरबीआयने स्मॉल बँक्स आणि पेमेंट्स बँक्स विषयी नियम लागू केल्यास वरील दोन्ही कंपन्यांना बँक सुरू करण्यासंबंधी संमती मिळेल.

बँकेसाठी या दोन्ही कंपन्यांना 100 कोटी रुपयांची आवश्यकता असून या कंपन्यांचे काम मात्र वेगवेगळे असणार आहे. पेमेंट्स बँकांना डिपॉझिट घेण्याचा अधिकार असणार आहे. परंतु, त्यांना कर्जसुविधा देता येणार नाही. त्यांना सर्व पैसा सरकारी बाँड (रोखे) मध्ये गुंतवावा लागणार आहे.

आरबीआय अशा बँकांसाठी क्षेत्र ठरवून देणार असून यामध्येच त्यांना कारभार करावा लागणार आहे. या बँकांना शेतकरी आणि लहान उद्योगांना कर्ज देण्यासंबंधीची परवानगी देण्यात येईल.

Leave a Comment