गेलला महाग पडणार पत्रकारावर केलेली टीका

gayle
एटींगा : महिला पत्रकारावर केलेल्या अश्लील टिकेमुळे वेस्ट इंडीजचा आघाडीचा फलंदाज ख्रीस गेल वादाच्या भोवऱयात सापडला आहे. गेलची जीभ पत्रकार परिषदेत महिला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना घसरली. गेलविरोधात महिला संघटनांनी मोर्चा वळविला असून, क्रीकेट संघटनेच्या अधिकाऱयांनी गेलचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गेलला पत्रकार परिषदेत महिला पत्रकाराने मैदानाविषयी प्रश्न विचारल्यावर त्याने ‘मी अद्याप तुम्हाला हात लावलेला नाही, त्यामुळे मैदानाविषयीच्या माझ्या भावना नाही व्यक्त करु शकत.’ अशा अश्लील शब्दांत त्या महिला पत्रकारावर टिपणी केली.

गेलच्या या टिपणीनंतर तो चांगलाच अडचणीत सापडला आहे. महिला संघटनांनी त्याच्याविरोधात आवाज उठविला असून, त्या महिला पत्रकाराची गेलने माफी मागावी असी मागणी या महिला संघटनांनी केली आहे.

Leave a Comment