राणेंना उद्धव यांचे चोख प्रत्युत्तर

uddhav
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका न करता त्यांचे समर्थक रवींद्र फाटक यांना पक्षात घेऊन करुन दाखवले. राणे यांचे नाव न घेता त्यांच्या सांत्वनाची गरज आहे. ते ज्या पक्षात जातील त्यांना तिथे शांती मिळो, अशी खोचक प्रतिक्रिया उद्धव यांनी दिली. तर राणे यांची आपल्याला किव येते. बुडता बुडता राणेंना अवदसा सुचली आहे, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे.

ठाण्यातले नगरसेवक रवींद्र फाटक यांना नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते, त्याच फाटकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी हा पक्षप्रवेश मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला. शुक्रवारी नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी काहीही न बोलता राणेंना प्रत्युत्तर दिल्याचे मानले जाते आहे.

शुक्रवारी राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका हवेत संपते न संपते तोवर नारायण राणे यांच्या निष्ठावंताला शिवसेनेत आणत उद्धव यांनी हे काहीही न बोलता प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. एवढच नाही तर अजून काही काँग्रेसची बडी नावे आपल्या संपर्कात आहेत, शिवसेनेत य़ेण्यास उत्सुक आहेत असा गौप्यस्फोट शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

काँग्रेसला रवींद्र फाटक यांच्या शिवसेना प्रवेशाने फारसा फरक पडत नाही, असे जरी काँग्रेसने म्हटले असले तरी काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे यात शंकाच नाही. ठाण्यातले एकूण सात नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्याने पक्षाला हा फार मोठा फटका आहे.

Leave a Comment