फाळणी… भारताकडून ५.६ अब्ज रुपयांचे येणे; पाकचा दावा

indo-pak
कराची – पाकिस्तानकडून नेहमीच कुरघोड्या सुरु असून त्यात अजिबात खंड पडलेला नाही,सीमेवर घुसखोरी,दहशतवादाला चालना देणाऱ्या पाकने आता फाळणीवरून नवा मुद्दा उपस्थित करून भारताला वेठीस धरण्याचा प्रकार केला आहे ,ज्या वेळी फाळणी झाली त्यावेळी पाकला भारताकडून सुमारे ५ अब्ज ६0 कोटी रुपये मिळालेले नाहीत ,भारताकडे ती थकबाकी आहे असा सूर आळवला आहे.

भारत-पाक द्विपक्षीय चर्चेत या थकबाकीवर कधीच चर्चा झाली नाही. मात्र, स्टेट बँक ऑफ पाकिस्तान नेहमीच आपल्या वार्षिक अहवालात भारतावरील या थकबाकीच्या रकमेचा उल्लेख करत आली आहे.

भारतावर पाकचे सुमारे ५ अब्ज ६0 कोटी रुपयांचे देणे आहे. ही रक्कम फाळणीच्या वेळची आहे. फाळणीवेळी ही रक्कम अवघी ४९ कोटींची होती. मात्र, आता तिचे मूल्य वधारल्यामुळे ती ५ अब्ज ६0 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, असा दावा पाकिस्तानी रिझर्व्ह बँकेने केला आहे.

मात्र, आता पाकिस्तानी माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. ‘द एक्स्प्रेस’ या पाक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, स्वातंत्र्यावेळची ४९ कोटी रुपयांची रक्कम महागाई, विनिमय दर आणि रोखे दरांतील बदलांमुळे वेगाने वाढली आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननुसार, भारतावर तिचे ४.१ अब्ज रुपयांचे सोन्याचे नाणे, ५0 कोटी रुपयांचे स्टर्लिंग रोखे, भारत सरकारचे २४ कोटी रुपयांचे रोखे आणि ४९ लाख रुपयांची नाणी थकीत आहेत. पाकने हा दावा १९४७ मध्ये झालेल्या एका विशेष कराराचा दाखला देत केला आहे. या करारानुसार, फाळणीनंतर दोन्ही देशांची एकच बँक अर्थात भारत रिझर्व्ह बँक होती. त्यानंतर ३0 सप्टेंबर १९४८ पर्यंत पाकिस्तानात भारतीय रुपया चलन म्हणून स्वीकारला जात होता.

2 thoughts on “फाळणी… भारताकडून ५.६ अब्ज रुपयांचे येणे; पाकचा दावा”

Leave a Comment