दहशतवाद्यांचा काबूल विमानतळावर हल्ला

airpost
काबूल – आज पहाटे काबूल विमानतळावर सशस्त्र दहशतवाद्यांनी भीषण हल्ला चढवला. विमानतळ परिसरात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत, बॉम्बस्फोट घ़डवून आणले.

दहशतवाद्यांनी पहाटे साडेचारच्या सुमारास विमानतळाजवळ निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या एका इमारतीचा ताबा घेतला व तेथून विमानतळावर हल्ला चढवला. विमानतळाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अफगाणिस्तानच्या सुरक्षा पथकांनी लगेचच या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले.

सध्या अफगाण जवानांनी दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या इमारतीला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. अजूनही दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु आहे अशी माहिती काबूलचे पोलिस प्रवक्ते हशमत स्तानीकाझी यांनी दिली. या हल्ल्यात अजूनपर्यंत तरी कोणीही जखमी झालेले नाही. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Leave a Comment