मुंबई बाँबस्फोटातील आरोपीला अटक

mumbai-blast
मुंबई – मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबईत २०११ साली झालेल्या बाँबस्फोटांसाठी इंडियन मुजाहिदीनला आर्थिक रसद पुरवणा-या अब्दूल मतीनला गोव्यातून अटक केली आहे. पोलिस तपासात मतीनने यासीन भटकळला पैसे पुरवल्याचे समोर आले होते.

१३ जुलै २०११ मध्ये मुंबईतील झवेरी बाजार, दादर आणि करीरोड या भागांमध्ये इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने तीन साखळी स्फोट घडवून आणले होते. या बॉम्बस्फोटात सुमारे १७ जणांचा मृत्यू झाला होता. हे बॉम्बस्फोट मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळने घडवले होते. अब्दूल मतीनने बॉम्बस्फोट घडवण्यासाठी यासीनला आर्थिक मदत केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. मतीनने दुबईतून हवालाद्वारे आर्थिक मदत केल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर पोलिसांनी मतीनविरोधात लुकआऊट नोटीसही काढली होती. बुधवारी एटीएसने गोवा येथून मतीनला अटक केली. याप्रकरणातील आरोपी यासीन भटकळ याला काही महिन्यांपूर्वीच पोलिसांनी अटक केली होती.

Leave a Comment