‘अच्छे दिन’ आले होमलोनला

home-loan
मुंबई : स्वस्त घरांसाठी काही नवी मार्गदर्शक तत्वे आरबीआयने जाहीर केली असून मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कोलकत्ता आणि हैदराबादमध्ये ६५ लाख किंवा त्यापेक्षा कमी किंमतीतील स्वस्त घरांना ५० लाखापर्यांतचे गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात आली आहे.

स्वस्त घरासाठी अन्य शहरांमध्ये ४० लाख गृहकर्जाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. या नव्या नियमांचा लाभ डेव्हलपर्संनाही होणार असून यामुळे पायाभूत सुविधेलाही चालना मिळणार आहे. अशा योजनांसाठी बँका सहज कर्ज उपलब्ध करून देतील, अशा प्रकारच्या कर्जावर सीआरआर आणि एसएलआरचे नियम लागू होणार नाहीत.

Leave a Comment