मोदी- शि जिंनपिंग भेटीत सीमा प्रश्न आणि व्यापार धोरणावर चर्चा

meet
ब्राझील- येथे सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेसाठी आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची बैठक नुकतीच पार पडली असल्याचे वृत्त आहे. ८० मिनिटे चाललेल्या या भेटीत भारत चीन सीमा प्रश्नावर तसेच दोन्ही देशांतील व्यापार संबंधांवर विस्तृत चर्चा झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार चीनी लष्कराची भारतीय सीमेत होत असलेली घुसखोरी अणि दीर्घ काळ लोंबकाळलेला भारत चीन सीमाप्रश्न दोन्ही बाजूंनी न्याय तोडगा काढून सोडविला जावा यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. मोदींनी सीमा भागात शांतता आणि सद्भाव राहण्यासाठी परस्परांत विश्वास निर्माण झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच कैलास मानसरोवर यात्रेसाठी दुसरा अतिरिक्त मार्ग सुरू करावा अशी मागणी केली त्यावर विचार केला जाईल असे चीनचे अध्यक्ष म्हणाले.

चीनचे अध्यक्ष शि जिंनपिग यांनी भारताने व्यापार क्षेत्रासाठी भारताने सेवा पुरवावी अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच मोदींनी चीनने भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक करावी अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. जिनपिग यांनी भारत चीन देशाचे प्रमुख भेटतात तेव्हा सार्‍या जगाचे लक्ष या भेटीकडे लागलेले असते असे सांगून शांघाय को ऑप. ऑरगनायझेशनच्या बैठकीला मोदींनी उपस्थिती लावावी असे आमंत्रण यावेळी दिले असल्याचे समजते. एपीइसीची ही बैठक या वर्षअखेर होणार आहे.

Leave a Comment