प्रेझेंटेशन परङ्गेक्ट करा

presentation
इंटरव्ह्यू देणार्‍या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूचा एक भाग म्हणून काही वेळा प्रेझेंटेशन करावे लागते. त्याचबरोबर काही वेळा वरिष्ठ वर्गातल्या विद्यार्थ्यांना सेमिनार द्यावे लागते. अशा वेळी आपले प्रेझेंटेशन जितके निर्दोष माहितीपूर्ण आणि आकर्षक असेल तेवढा आपला प्रभाव पडतो, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु प्रेझेंटेशनचा सर्वात आव्हानात्मक आणि उमेदवाराची कसोटी पाहणारा भाग असतो तो प्रश्‍नोत्तराचा. या कसोटीला जो विद्यार्थी चांगला उतरतो तो इंटरव्ह्यूचा सागर पार करून गेलाच समजावे. मात्र या सत्रासाठी आपल्याला विशेष तयारी करावी लागते. त्यातली पहिली तयारी म्हणजे आपले श्रोते कोण आहेत हे नीट ओळखणे. काही वेळा विद्यार्थी श्रोते असतात. तेव्हा ती काय प्रश्‍न विचारतील यावर आपण आधीच चिंतन करावे. म्हणजे एखादा विचारला गेलेला प्रश्‍न अनपेक्षितपणे समोर आल्यावर जी गडबड होते ती होणार नाही. काही वेळा आपल्यापेक्षा वरिष्ठ मंडळी, आपला इंटरव्ह्यू घेणारे पॅनल मेंबर्स किंवा आपले प्राध्यापकच श्रोत्यात बसलेले असतात. तेही प्रश्‍न विचारू शकतात. मात्र विद्यार्थ्यांनी प्रश्‍न विचारण्यामध्ये आणि आपल्यापेक्षा ज्येष्ठ मंडळींनी प्रश्‍न विचारण्या-मध्ये मोठा ङ्गरक असतो.

विद्यार्थी शंका विचारतात किंवा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रश्‍न विचारतात. ज्येष्ठ मंडळी मात्र आपल्यापेक्षा विद्वान असल्यामुळे त्यांना आपल्याकडून कसलीही नवी माहिती करून घ्यायची नसते. ते आपली परीक्षा घेण्यासाठी आणि आपण तो विषय किती परिपूर्णपणे तयार केलेला आहे हे बघण्यासाठी प्रश्‍न विचारत असतात. असेही प्रश्‍न विचारले गेले तरी आपण गडबडून जाता कामा नये. कारण कोणताही विषय अगम्य नसतो. आपण प्रेझेंटेशनमध्ये न दाखवलेला असा बराच भाग आपल्या मनामध्ये असतो आणि तो आठवला की या ज्येष्ठ मंडळींच्या उलट तपासणीला आपण उतरू शकतो. प्रश्‍नोत्तराच्या सत्रामध्ये तिसरा वर्ग असतो तो खोडसाळ लोकांचा असतो. त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती कशी आहे हे दाखवून देण्यासाठी ते प्रश्‍न विचारतात. त्यांची भावना वाईट असली तरी आपण मात्र त्यांना निर्मळ मनाने सामोरे गेले पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसेल तर तसे नम्रपणे सांगायला सुद्धा हरकत नाही. एकंदरीत प्रेझेंटेशन सादर करण्यापेक्षा या प्रश्‍नोत्तरामध्ये आपला कस लागत असतो हे विसरता कामा नये.

Leave a Comment