पूर्व विदर्भात शिवसेनेला एकही जागा न देण्याची मागणी

krushna
नागपूर – नागपूर भाजपचे अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे यांनी शिवसेनेला पूर्व विदर्भात कोणत्याही परिस्थितीत विधानसभेचे मतदारदार संघ देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय म्हणून आमदार खोपडे हे ओळखले जातात.

पूर्व विदर्भातील विधानसभेच्या सर्व जागा भाजपने लढवाव्यात, कारण शिवसेनेची ताकद अजिबातच नाही, त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला कोणत्याही विधानसभा मतदारसंघ अजिबात देऊ नये असेही खोपडे म्हणतात.

काल झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आमदार खोपडे यांनी ही मागणी केल्याचे जय महाराष्ट्र सोबत बोलतांना म्हटले आहे. विधानसभा
निवडणूकीत जर ही मागणी मान्य होत नसेल तर भाजपने सर्वच २८८ जागी स्वबळावर लढावे असेही खोपडे म्हणतात.

दरम्यान एकीकडे शिवसेना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना शिवसेनेत स्थान देत आपली ताकद वाढवत आहे. तर मागील २४ वर्षांपासूनची असलेली युती मात्र टिकवण्यासाठी दोन्ही पक्षांनी पावले टाकणे गरजेचे असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment