मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होऊ दया – पवार

munde7
जालना – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. जालन्यामध्ये राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी ही मागणी केली. ते म्हणाले ,सीबीआय चौकशीमुळे दुध का दुध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. एका गाडीला दुसऱ्या गाडीने धडक दिली म्हणजे माणूस मरतो का? असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला.गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा बहुजन चेहरा आता भाजपकडे राहिला नाही.

दरम्यान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी आणि सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर विद्यापीठ असे नाव द्याव असा सरकारचा विचार आहे मात्र त्या विद्यापीठांच्या सिनेटने प्रस्ताव दिल्यावरच हे शक्य होईल असेही त्यांनी सांगितले . पवार यांनी औरंगाबादमध्येही मेळाव्यात मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीसाठी मतभेद विसरून तयारीला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले .