नोकरीची भारतीय लष्करात संधी

ncc
मुंबई – एनसीसीच्या विद्यार्थ्यांना भारतीय लष्करात नोकरीची संधी आहे. भारतीय लष्करात राष्ट्रीय छात्र सेना स्पेशल एन्ट्री स्किम अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे ही भरती करण्यात येणार आहे.

यामध्ये एनसीसीच्या मुलांसाठी ५० जागा आणि एनसीसी मुलींसाठी ४ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ ऑगस्ट आहे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ५-११ जुलै २०१४ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Comment