स्वस्त होणार ह्रदयविकार, डायबेटिसवरील औषधे

medicin
मुंबई – ह्रदयविकार व मधुमेह या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठ दिलासा मिळणार आहे कारण या आजारांवरील औषधे तब्बल ३५ टक्क्यांपर्यंत स्वस्त होणार आहेत. १०८ औषधे नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय औषध दर नियंत्रक संस्था असलेल्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी या संस्थेने घेतला असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्रदयविकार व डायबेटिस या आजारांवरील औषधांचा समावेश आहे.

या निर्णयामुळे औषधे किंमतीच्या बाबतीत ह्रदयविकारावरील एकूण औषधांपैकी सुमारे ५८ टक्के तर डायबेटिसवरील एकूण औषधांपैकी २१ टक्के नियंत्रणखाली आली आहेत. देशातील औषधांचा व्यवसाय सुमारे ५,००० कोटी रुपयांचा असून या निर्णयाचा विपरीत परिणाम फार्मा कंपन्यांच्या नफ्यावर होणार असल्याची चिंता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सामाजिक स्वास्थ्य हा सर्वसामान्यांचा अधिकार असून जर औषधांच्या किमती भरमसाठ ठेवून रुग्णांना लुबाडण्यात येत असेल तर त्यात मध्यस्थी करण्याचा व रुग्णांचा भार हलका करण्याचा आपल्याला अधिकार असल्याचे एनपीपीएने म्हटले आहे. या कार्यवाहीमुळे येत्या काही दिवसांमध्ये ह्रदयविकार व डायबेटिस या आजारांवरील औषधे स्वस्त होतील अशी चिन्हे आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment