आयसीसीच्या रंकिंग मध्ये डिव्हिलियर्स, अजमल आघाडीवर

ajmal
दुबई – दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स तर गोलंदाजांच्या यादीत पाकचा फिरकी गोलंदाज सईद अजमल नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या वनडे मानांकन यादीत आघाडीवर आहेत.

भारताच्या विराट कोहलीने फलंदाजांच्या यादीत आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. कर्णधार धोनी सहाव्या तर शिखर धवन दहाव्या स्थानावर आहे. डिव्हिलियर्सने नुकत्याच झालेल्या मालिकेत २१२ धावा जमवित १३ गुण मिळविले. आता तो ८८५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या यादीत पाकच्या सईद अजमलने पहिले स्थान मिळविले असून भारताचा रविंद्र जडेजा दहाव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेने लंकेविरुद्धची वनडे मालिका २-१ अशा फरकाने जिंकून महत्त्वाचे रेटिंग गुण मिळविले. सांघिक यादीत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर असून भारत दुसऱया व दक्षिण आफ्रिका तिसऱया स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियापेक्षा ४ गुणांनी तर भारतापेक्षा केवळ एका गुणाने दक्षिण आफ्रिका पिछाडीवर आहे.

Leave a Comment