आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत फ्लेप्सचे दुसरे विजेतेपद

phelps
ऍथेन्स – आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अमेरिकन जलतरणपटून मायकेल फ्लेप्सने सलग दुसरे विजेतेपद मिळविले. फ्लेप्सने पुरुषांच्या १०० मी. बॅकस्ट्रोकमध्ये ५३.८८ सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान पटकाविले. या क्रीडा प्रकारात लोचेटी ५४.४० सेकंदाचा अवधी घेत दुसऱया स्थानावर राहिला. गेल्या शुक्रवारी १०० मी. बटरफ्लायमध्ये फ्लेप्सने लोचेटीला मागे टाकले होते. कॅलिफोर्नियात ६ ते १० ऑगस्ट दरम्यान होणाऱया अमेरिकन जलतरण स्पर्धेत फ्लेप्स १०० मी. फ्रीस्टाईलमध्ये भाग घेणार आहे.

Leave a Comment