धागेदोरे हाती ;”सीसीटीव्ही’मध्ये पुणे स्फोटाची दृश्य कैद

puneblast
पुणे – पुणे स्फोटाचे धागेदोरे हाती लागल्याचे स्पष्ट संकेत एटीएसने दिले आहेत. फरासखाना पोलीस स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या एका दुकानातले फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून सीसीटीव्हीमध्ये स्फोटाची दृश्य कैद झाल्याने दुचाकी कोणी ठेवली याचा शोध लागण्याची दाट शक्यता आहे.

त्यानुसार पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी तब्बल 10 पथकांची स्थापना केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या सीसीटीव्हीत स्फोट होतानाची दृश्यं कैद झाली आहेत. ज्या दुचाकीत हा स्फोट झाला, ती पोलीस स्टेशनच्या आवारात पार्क करतानाची दृश्यंही सीसीटीव्हीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात पोटॅशियम नायट्रेट, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आणि बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ज्या पद्धतीने हा स्फोट घडवलाय, ते पाहता यामागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment