हवेतून पेपरस्प्रे करून गर्दी पांगविणारे ड्रोन विकसित

drone
दक्षिण आफ्रिकी कंपनी डेझर्ट वुल्फने गर्दी पांगविण्यासाठी वापरता येईल असे हवेतून पेपर स्प्रे आणि प्लॅस्टीक गोळ्यांचा वर्षाव करणारे ड्रोन तयार केले असून त्याचे प्रदर्शन लंडन ट्रेड शेा मध्ये करण्यात आले आहे. या ड्रोन साठी २५ ऑर्डर कंपनीला मिळाल्या असून त्या खाण कंपनीकडून आल्याचेही सांगितले जात आहे. निदर्शने, मोर्चे अशा गर्दीला पांगविण्यासाठी सुरक्षा रक्षकांना स्वतःच्या जीवाला धोक न होऊ देता या ड्रोन मुळे नियंत्रण मिळविता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. मात्र विरोध दर्शविणे, निदर्शने करणे हा आम नागरिकाचा हक्क आहे आणि त्यांच्यावर असा प्रयोग करणे हे योग्य नसल्याने आंतरराष्ट्रीय ट्रेड युनियनने या ड्रोन च्या वापराला विरोध केला आहे.

स्कुंक ऑक्टाकॉप्टर ड्रोन असे याचे नामकरण केले गेले आहे. त्यात ४ पेंटबॉल बारल असून सेकंदाला २० गोळ्या झाडण्याची त्याची क्षमता आहे. पेपर स्प्रे बरोबरच डाय मार्कर बॉल्स, सॉलिड प्लॅस्टीक बॉल्स यातून डागता येतात. त्या अगोदर पब्लीकला सूचना देण्यासाठी स्पीकर वापरला जातो. या ड्रोन मधून एकावेळी ४ हजार गोळ्या झाडता येतात.

रोबोट आर्म्स या आंतरराष्ट्रीय समितीचे अध्यक्ष नोएल शर्की यांनी हवेतून प्लॅस्टीक गोळ्या झाडल्या गेल्या तरी त्यामुळे गोळ्या लागणार्‍यांना अपंगत्व येऊ शकते व क्वचित प्रसंगी जीवासही मुकावे लागते असे सांगून या ड्रोनच्या वापरावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.