आता चीन, आफ्रिकेत सुद्धा आयसीआयसीआय बँकेच्या शाखा

icici
मुंबई – चालू आर्थिक वर्षात चीन आणि दक्षिण आफ्रिकेत देशाच्या खाजगी बॅकिंग क्षेत्रातील अग्रमानांकित आयसीआयसीआय बँक आपल्या शाखा सुरू करणार आहे. विदेशात व्यापारी क्षेत्राच्या उद्देशाने बँकेने हा निर्णय घेतला आहे. या दोन्ही देशात सध्या बँकेची केवळ ऑफिस आहेत. बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी याविषयी सर्व माहिती दिली आहे.

अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, बेहरीन, श्रीलंका, दुबई आणि कतार या देशांमध्ये यापूर्वीच बँकेच्या शाखा आहेत. तसेच सौदी अरब, बांगलादेश, थायलँड, मलेशिया आणि इंडोनेशिया येथे बँकेची ऑफिस आहेत. बँकचे सध्याचे विदेशातील बिझनेस नफ्यामध्ये असल्यामुळे बँकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखीनच लक्ष्य केंद्रित करण्याचे ठरविले असल्याचे कोचर यांनी सांगितले. चीनमध्ये शंघाई पुडोंगमध्ये तर आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे ऑफिस आहे. 2013-14 मध्ये बँकेला 5895 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात हे उत्पन्न 4692 कोटी रुपये एवढे होते. देशातील उत्पन्नाचा विचार करता या दरम्यान बँकेचे उत्पन्न 43,729 कोटी रुपयांवरुन 48,711 कोटी रुपयांवर पोहचले आहे.

Leave a Comment