वेस्ट इंडीजचा विजय, मालिका बरोबरीत

west-indies
डोमिनिका – टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने न्यूझीलंड संघावर ३९ धावांनी विजय मिळवित मालिका १-१ ने बरोबरीत सोडली. पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला होता. वेस्ट इंडीजचा फ्लेचरने या सामन्यात सर्वाधिक ६२ धावा काढून सामना आणि मालिकावीर ठरला

प्रथम फलंदाजी करीत वेस्ट इंडीज संघाने २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या. सलामीचा फलंदाज स्मिथ केवळ ९ धावा काढून बाद झाला. त्यानंतर सिमन्स व फ्लेचर या जोडीने दुसर्‍या गड्यासाठी ६६ धावांची भागी करुन संघाला सावरले. सिमन्सने ३६ व फ्लेचरने ३ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६२ धावा काढल्या. ब्राव्हो, पोलार्ड, सामी व रसेल यांनी दोन आकड्यात प्रवेश केला होता.

विजयासाठी १६६ धावांचा पाठलाग करण्यात न्यूझीलंड संघ थिटा पडला. या संघाने १९.१ षटकात सर्वबाद १२६ धावा केल्या. कॉट्रेलीने २८ धावात ३, सुनील नरिनेने १९ धावात २ गडी बाद केले. केर्न विल्यम्सनने ३७, मॅकलमने २१, टेलरने २१, ऍण्डरसनने १४ व वॅटलिंगने १२ धावा नोंदविल्या. तळातील शेष चार फलंदाजांनी केवळ ११ धावा जोडल्या व ३९ धावांनी पराभव पत्करला. इतकेच नव्हे तर मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

Leave a Comment