शेअऱ बाजारात उत्साह

share-market
मुंबई – बहुमताने सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी सरकार अर्थसंकल्पात विकासाला चालना देणारे निर्णय घेईल अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा असल्याने सोमवारप्रमाणे आजही शेअऱ बाजारात उत्साह दिसून येत आहे.

मंगळवारी सकाळी बाजार उघडताच सोमवारी २६,१०० वर बंद झालेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २६,१९० पर्यंत पोहोचला. यावेळी निफ्टीनेही प्रथमच ७८०० चा टप्पा पार केला.

सकाळी बाजार उघडताच निफ्टीमध्ये २१.७० अंकांची वाढ होऊन निफ्टीने ७,८०८.८५ अंकांपर्यंत पोहोचला. निफ्टीची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

कालच्या दिवसभराच्या व्यवहारात निफ्टी ७,७९२ पर्यंत पोहोचला होता. मागच्या दोन दिवसात निफ्टीमध्ये ७२ अंकांची वाढ झाली आहे. अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवण्यावर भर दिला जाईल या आशेवर गुंतवणूकदार मोठया प्रमाणावर खरेदी करत आहेत.

Leave a Comment