राज ठाकरेंचे डॅमेज कंट्रोल यशस्वी! गीतेंची नाराजी दूर

raj
नाशिक – आमदार वसंत गिते यांची नाराजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दूर झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गीतेंची नाराजी आणि पक्षातील वाद मिटवण्यासाठी कालच नाशिकला रवाना झाले.

नाशिकमध्ये गीतेंच्या निवासस्थानी जाऊन आज सकाळी मनसेचे आमदार प्रवीण दरेकर आणि दीपक पायगुडे यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर गीतेंची राज ठाकरे यांनीही भेट घेतली. मात्र, गीतेंनी या भेटीनंतर आपण नाराज नसल्याचे पत्रकारांना सांगत कामास सुरूवात करण्याचे संकेत दिले आहेत. महापालिकेत सभापतीच्या निवडीमुळे गीतेंसह मनसेचे आणखी काही पदाधिकारी नाराज झाले होते.

नाशिकमध्ये या नाराजीमुळे मनसेत फुट पडण्याचे चिन्ह दिसताच राज ठाकरे तातडीने नाशिकला रवाना झाले. राज ठाकरे रविवारपासून नाशिकमध्ये असूनही प्रकृतीचे कारण देऊन गीतेंनी त्यांची भेट घेण्याचे टाळले होते.

Leave a Comment