उपांत्यपूर्व फेरीत गतविजेता मरे पराभूत

andy-murry
लंडन- विम्बल्डन एकेरीतील गतविजेता अँडी मरेचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. ब्रिटनच्या मरेला बल्गेरियाच्या ग्रिगर दिमित्रोवने एकतर्फी लढतीत ६-१, ७-६(७/४), ६-२ असे पराभूत केले.

दिमित्रोवला मरेकडून दुसरा सेट वगळता प्रतिकारच झाला नाही. विम्बल्डनमध्ये प्रथमच २३ वर्षीय दिमित्रोवने ग्रँडस्लॅममध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवताना उपांत्य फेरी गाठली. गेल्या वर्षी विक्रमी विम्बल्डन जेतेपद पटकावणा-या ‘लोकल बॉय’ मरेला जेतेपद राखता आले नाही.

Leave a Comment