
तिरकीत – इराकमध्ये अडकलेल्या 46 परिचारिकेंच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तिरकीत या शहरात अडकून पडलेल्या या परिचारिकांना अन्यत्र हलवले गेले आहे. तसेच ह्या परिचारिका अतिरेकी संघटनेच्या ताब्यात असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अतिरेक्यांनी उडवले हॉस्पिटल, ५ भारतीय परिचारिका जखमी
परराष्ट्र मंत्रालयाने बॉम्बस्फोटात काही नर्सेस किरकोळ जखमी झाल्याचे मान्य केले आहे. मात्र सर्व परिचारिका सुरक्षित असल्याचा दावा मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी केला आहे.
यातल्या अनेक नर्सेस गंभीर जखमी झाल्याचा दावा केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी केला होता. यावर भाष्य करण्यास अकबरुद्दीन यांनी नकार दिला आहे. आपण केवळ आपल्या मंत्रालयाकडे असलेली माहिती देत असल्याचे ते म्हणाले आहेत.
