प्रीतीचे आरोप चुकीचे ,वाडियांनी दिले पत्र

ness-wadia
मुंबई : सोशल मिडीयाचा आधार घेणाऱ्या आणि सर्व आरोपांना तिलांजली देणाऱ्या अभिनेत्री प्रीती झिंटा हिने केलेले सर्व आरोप तिच्यासमवेत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या उद्योगपती नेस वाडिया यांनी खोडून काढले आहेत,तसे पत्र त्यांनी पोलिसांना सादर केले आहे ,परिणामी विनयभंगप्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

प्रीती झिंटाने केलेल्या आरोपांप्रकऱणी नेस वाडीयांनी पोलीसांना आज एक पत्र सादर केले . या पत्रात नेस वाडियांच्या बाजूने साक्ष देणाऱ्या नऊ साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रीती झिंटाने केलेले आरोप चुकीचे असल्याचे नेस वाडीयांनी म्हटले असून एका पानाचे हे पत्र त्यांनी पोलिसांना सादर केले आहे . गेल्या महिन्यात प्रीती झिंटाने नेस वाडीयांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. काल याप्रकरणी पारुल खन्ना आणि किंग्ज एलेव्हन पंजाबचे सीईओ फ्रेजर केस्लिन यांची साक्ष नोंदवली गेली.पारुल खन्ना हे प्रीतीच्या सोसायटीत राहतात. दरम्यान, पारुल यांनी प्रीतीच्या बाजून साक्ष नोंदवत तिच्या तक्रारीशी सहमती दर्शवली आहे. तर प्रीतीच्या आरोपांबाबत पूर्णपणे माहिती नसल्याचे किंग्ज इलेव्हनचे फ्रेजर यांनी म्हटले आहे.
त्यामुळे या सर्व प्रकरणात काहीसे अडचणीत आलेल्या नेस वाडियांनी आज प्रीतीविरोधात पत्र सादर करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment