मेक्सिको-हॉलंड आज लढत
फोर्टालेजा : फिफा विश्वचषक स्पर्धेतील बाद फेरीतील सामन्याला सुरवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येेक संघापुढे करो या मरोचे आव्हाकन असणार आहे. बाद फेरीच्या सामन्यात आज मेक्सिको आणि हॉलंड झुंजणार आहेत. मेक्सिकोचे लक्ष्य हॉलंडचे विजयी अभियान रोखणे हे असणार आहे. दुसरीकडे, हॉलंड संघ आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवून थाटात स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी मैदानात उतरणार असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हॉलंडचा अनुभवी वॉन पर्सी याला निलंबित करण्यात आले होत़े मात्र, मेक्सिकोविरुद्धच्या लढतीत तो खेळणार असल्यामुळे संघात चैतन्य निर्माण झाले आह़े तो आपला साथीदार रॉबेनसोबत मजबूत अॅटॅक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल़ या जोडीने जर्मनीचा थॉमस म्युलर, अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी आणि ब्राझीलचा नेयमार यांच्या प्रत्येकी ४ गोलनंतर स्पर्धेत प्रत्येकी ३ गोल नोंदविण्याची किमया साधली आहे.
हॉलंड संघात वॉन पर्सी याचे पुनरागमन होणार असल्यामुळे ३३ वर्षीय डिर्क कुयट याला बाहेर बसावे लागेल़ मात्र, बदली खेळाडू म्हणून कुयट खेळू शकतो़ दरम्यान, २ सामन्यांत २ गोल करूनही २२ वर्षीय फॉरवर्ड मेम्फिस डिपेय याला संघाबाहेर बसावे लागण्याची शक्यता आह़ेस्पर्धेत जबरदस्त खेळ करणारा हॉलंड संघ ‘ब’ गटात ९ गुणांसह आघाडीवर,तर मेक्सिको संघ ‘अ’ गटात ७ गुणांसह दुस:या क्रमांकावर विराजमान आह़े हॉलंड संघात वॉन पर्सी आणि रॉबेनसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश असला, तरी मेक्सिकोविरुद्ध त्यांना सावध खेळ करावा लागेल.

