अस्तित्वाविषयी संशय असणाऱ्या कंपन्यांची होणार सेबीकडून तपासणी

sebi
मुंबई – भांडवली बाजाराची नियंत्रक ‘सेबी’ने फक्त कागदोपत्री अस्तिवात असणाऱ्या कंपन्यांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, अशा संशयित कंपन्यांच्या कार्यालयाची ‘सेबी’कडून अचानक पाहणी करण्यात येणार आहे. ‘सेबी’कडून सध्या फक्त कागदावर अस्तित्वात असणाऱ्या या कंपन्यांकडून ग्राहकांना असणारा धोका लक्षात घेता विशेष प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. याअंतर्गत पाहणी करण्यात येणाऱ्या संशयित कंपन्यांच्या नावांची निश्चिती करण्यासाठी विशिष्ट निकष ‘सेबी’कडून आखण्यात येणार आहेत. तसेच कंपन्यांच्या अस्तित्वाची सत्यता पडताळण्यासाठी एक प्रश्नावलीसुद्धा तयार करण्यात येणार आहे. या कंपन्यांची विशिष्ट अशी मोंडस-ऑपरेंडी असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. प्रथम ग्राहकांना अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून आयपीओ आणि अन्य माध्यमातून गुंतवणूक करण्यास अशा कंपन्यांकडून प्रवृत्त केले जाते.

Leave a Comment