ऑस्ट्रेलियन सुपरच्या अंतिम फेरीत सायना

saina
सिडनी – चांगल्या फॉर्मसाठी धडपडणा-या सायनाला अखेर सूर गवसला असून, चीनच्या अव्वल सीडेड शिझिआन वांगचा सायनाने पराभव करीत, ऑस्ट्रेलियन सुपर सिरिजच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

तीन सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सहाव्या सीडेड सायनाने वांगवर २१-१९,१६-२१ आणि २१-१५ अशी मात केली.

वांगने याआधीच्या दोन लढतीत सायनाला पराभूत केले होते. याआधी परस्परा विरुध्द खेळल्यामुळे दोघींना परस्परांच्या खेळातील बलस्थाने, कच्चेदुवे चांगले माहित होते.

सायनाने निर्णायक क्षणी आपली कामगिरी उंचावत सेटसह सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. सायनाला वर्षातील दुसरे जेतेपद पटकावण्याची संधी आहे. याआधी सायनाने वर्षाच्या सुरुवातीला इंडियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.

Leave a Comment