जर्मनीने मिळवले गटातील अव्वलस्थान

germany

मनौस – फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा थॉमस म्युलर चांगलाच फॉर्मात आहे. त्याने अमेरिकेविरूध्द केलेल्यात एका गोलच्या जोरावर विजय मिळविला आहे. या सामन्यातील विजयामुळे जर्मनीला बाद फेरी गाठता आली आहे.त्याचसोबतच या गटातील अव्वलस्थान जर्मनीने पटकाविले आहे.

या निर्णायक सामन्याात अमेरिकेचा संघ पराभुत झाला असला तरी, दुसरीकडे पराभव पदरी पडूनही अमेरिकेला बाद फेरीत स्थान मिळाले आहे. दुस-या सामन्यासत पोर्तुगालला अपेक्षित गोलफरकाने आपला विजय साकारता आला नाही. त्या मुळे पराभूत होवूनही अमेरिकेचा संघ बाद फेरीत पोहचला आहे.

या सामन्याच्या दुस-याच मिनिटाला बोइटंगच्या क्रॉसवर गोल करण्याचा थॉमस म्युलरचा प्रयत्न चुकला.१५व्या मिनिटाला थॉमस म्युलर आणि फिलीप ल्हाम यांनी सुंदर पद्धतीने चेंडूला खेळवत बोइटंगकडे सोपवला. मात्र तो अयशस्वी ठरला. ३६व्या मिनिटाला मेस्युट ओझिलने शिताफीने चेंडूवर नियंत्रण मिळवले. मात्र गोल करताना झालेल्या चुकीमुळे गोन्झालेझने हा प्रयत्न रोखला. ४८ व्या मिनिटाला जर्मनीच्या बोइटंगचा क्रॉसचा फटका मिरोस्लाव्ह क्लोजकडे गेला. मात्र गोन्झालेझने अचूकतेने हा प्रयत्न थोपवला.

Leave a Comment