फ्रान्ससोबत बरोबरी साधूनही इक्वेडोर स्पर्धेबाहेर

ekvedar

फोर्टालेझा – फिफा फुटबॉल विश्वचषक स्पंर्धेतील ‘इ’ गटातील अटातटीच्याे लढतीत फ्रान्सा आणि इक्वेाडार संघाला विजय आवश्यक होता. त्यामुळे या लढतीला विशेष महत्त़व प्राप्त झाले होते. या लढतीत सुरुवातीपासूनच फ्रान्स्चे वर्चस्व राहिले मात्र,त्यांना इक्वेेडरच्याल आक्रमणामुळे या सामन्यात गोल करून विजय मिळविता आला नाही. त्यावमुळे ०-० अशा बरोबरीत सुटलेल्या लढतीमुळे इक्वेडारच आव्हान संपुष्टात आले.

या सामन्यावत करिम बेन्झेमा हा फ्रान्सचा अव्वल आघाडीपटू असला तरी या सामन्यात त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघांकडून चांगलाच आक्रमक खेळ झाला, पण एकाही संघाला यश आले नाही. यामध्ये सर्वात जास्त श्रेय अलेक्झांडर डोमिनगुएझला द्यायला लागेल. कारण त्याच्या बचाव कौशल्यामुळे इक्वेडोरवर गोल होऊ शकला नाही. सामन्याच्या १५ व्या मिनिटाला अँटोनी ग्रिझमनचा फटका गोलपोस्टला लागला, पण गोल काही झाला नाही.

दुस-या सत्राच्या चार मिनिटांनंतरच गोलवरील ताबा सुटून फ्रान्सच्या खेळाडूला जायबंदी केल्याप्रकरणी इक्वेडोरचा अव्वल खेळाडू अँटोनिया व्हॅलेन्सियाला पंचांनी लाल कार्ड दिले आणि इक्वेडोरचा संघ अडचणीत आल्याचे म्हटले जात होते. पण इक्वेडोरचा संघ दहा खेळाडूंनिशी त्याच ताकदीने खेळला आणि फ्रान्सला एकही गोल करू दिला नाही. हा सामना बरोबरीत सुटल्यारने इक्वे्डारचे आव्हान संपुष्टात आले आहे.

Leave a Comment