स्वित्झर्लंडकडून होंडुरासचा पराभव

swizarland

मनौस – फिफा फुटबॉल विश्वचषक स्परर्धेत स्वित्झर्लंडच्या संघाने दमदार कामगिरीच्या जोरावर होंडुरास विरूध्दची लढत ३-० अशा फरकाने जिंकली आहे. या विजयामुळे स्वित्झर्लंडच्या संघाला बाद फेरी गाठता आली आहे. बाद फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी स्वित्झर्लंड संघाला या सामन्यात विजय आवश्यक होता.

सुरुवातीपासून एकतर्फी ठरलेल्याट या सामन्यात स्वित्झर्लंडच्या शाकीरीने ६, ३१ आणि ७१ व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर स्वित्झर्लंड संघाने हा सामना जिंकला. या सामन्याात होंडूरास संघाच्या एकाही खेळाडूला गोल करता न आल्याने त्यांना हा पराभव पत्कारावा लागला. स्वित्झर्लंड संघाला या सामन्यात विजय आवश्यक होता.

होंडूरासचा संघ याआधी झालेल्या दोन्ही सामन्यात पराभूत झाला होता. विजय मस्ट असल्याने स्वित्झर्लंडच्या खेळाडूने प्रारंभीपासूनच आक्रमकपणा अवलंबिला.शाकीरीचा खेळ हा पाहण्याजोगा होता. सामन्याच्या सहाव्याच मिनिटाला त्याने गोल करून आज आपला दिवस असल्याची जाणीव करून दिली होती त्यानंतर त्याने ३१ आणि ७१ व्या मिनिटाला गोल करून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

Leave a Comment