जर्मनी-अमिरेकेत करो या मरो लढत

amerika

मनौस – फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ग गटात चुरस निर्माण झाली आहे. या गटातील जर्मनी आणि अमेरिका यांच्यात गुरुवारी बाद फेरीसाठी मुकाबला रंगणार आहे.त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाद फेरीत पोहचण्यासाठी दोन्हीस संघाना विजय आवश्यक आहे.

जर्मनीने पहिल्याच लढतीत पोर्तुगालला नमवले,परंतु घानाविरुद्ध त्यांना बरोबरीत समाधान मानावे लागले.दुसरीकडे अमेरिकेने घानावर मात केली, मात्र पोर्तुगालविरुद्धची त्यांची लढत बरोबरीत सुटली.त्यामुळे दोन्ही संघांची प्रत्येकी गुणसंख्या चार आहे. बाद फेरीत जाण्यासाठी दोन्ही संघांना बरोबरीही पुरेशी आहे.असे झाल्यास हे दोन्ही संघ पुढच्या फेरीत आगेकूच करतील आणि त्याच वेळी पोर्तुगाल आणि घानाचा प्रवास प्राथमिक फेरीतच संपुष्टात येईल.

मिरोस्लाव्ह क्लोस,थॉमस म्युलर आणि मेस्युट ओझिल हे त्रिकूट जर्मनीचा आधारस्तंभ आहे.अमेरिकेसाठी क्लिंट डेम्पसे हुकमी एक्का आहे.जर्मनीचे प्रशिक्षक जोआकिम लू आणि अमेरिकेचे प्रशिक्षक जुर्गेन क्लिन्समन या जुन्या मित्रांतील मुकाबला थरारक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment