निवडणुकीपर्यंत कॅम्पा कोलावर कारवाई नाही

campa-cola
मुंबई – विधानसभा निवडणूक कॅम्पा कोला रहिवाशांना चांगलीच पथ्यावर पडलेली आहे. या अनधिकृत घरांना राज्य सरकार, विधानसभा निवडणूक होईपर्यंत मान्यता देण्याच्या विचारात आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅम्पा कोला रहिवाशांना दिलासा दिला असून, त्यानुसार सोसायटीच्या ९६ अनधिकृत फ्लॅटला अधिकृत करण्याचा विचार सुरू आहे. सोमवारी याबाबत मुख्यमंत्र्यांनी सॉलिसिटर जनरल रंजीत कुमार आणि ऍड. जनरल दौरियस खंबाटा यांच्याशी चर्चा केलेली आहे.

सूत्रांनी सांगितले की, गॅस,पाणी आणि वीज यांचे कनेक्शन जरी काढले असले तरी बिल्डिंग तोडणार नाही. अनधिकृत घरे रिकामे करून पालिकेच्या हवाली केल्यानंतरच त्या बांधकामाला नियमित करण्याचे आवेदन देणार आहे. महानगर पालिकेने सांगितले की हा एक प्रकारचा चमत्कार म्हणायला काहीच हरकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवण्यात यावा, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांची आहे.