अंधश्रद्धेला खत पाणी घालणाऱ्या जाहिराती बंद करा

mumbai-highcourt
नागपूर – राज्य सरकारने जेष्ठ समाजसेवक नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर ताबडतोब अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर केला. परंतू हल्ली प्रत्येक खाजगी वाहिनीवर हनूमान चालिसा आणि कुबेर यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र खरेदीचे आमिष देतात. हे यंत्र घरात आणि कामाच्या ठिकाणी ठेवल्यास सुख व संपत्ती मिळेल असा अपप्रचार होतो आहे. काही प्रमाणात का होईना लोक याला बळी पडतात, त्यामुळे अंधश्रद्धेला वाव मिळत आहे. तेव्हा या जाहिरातींवर तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आली आहे.

यवतमाळच्या ऍड. गितेश पांडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. भूषण गवई आणि न्या. एस.बी.शुक्रे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा हायकोर्टाने माहिती व प्रसारण सचिव, राज्य सरकारचे गृह सचिव, समाज कल्याण सचिव, मुंबईतील पोलिस आयुक्त , नागपूर पोलिस आयुक्त , यासह विविध वृत्तवाहिणीला नोटीस बजावली आहे.

Leave a Comment