चव्हाणही पवारांच्या स्वप्नातील लवासाचे भागीदार

ashok
मुंबई – माजी ‘आदर्श’ मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या स्वप्नातील २६ लवासा शहरांना पाठिंबा दर्शवित, आपला ही असाच काही विचार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राज्यात पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी अशी केंद्रे महत्वाची असून यातून अनेकांना रोजगार मिळत असल्याचे सांगत चव्हाण यांनी पवारांच्या मागणीचे समर्थन केले आहे.

शरद पवार यांनी मंगळवारी लवासा सिटी सारखे आणखी २६ प्रकल्प महाराष्ट्रात उभारता येवू शकतात असे वक्तव्य केले होते. हा प्रकल्प सुरुवाती पासूनच वादात अडकला होता. त्यामुळे शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन टिका टिप्पणी सुरू आहे.

माजी ‘आदर्श’ मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांनी पवारांच्या भुमिकेचे समर्थन केले आहे. ‘महाराष्ट्रात पर्यटन विकास व्हावा या माताशी मी सहमत आहे. नियमांचे पालन करुन पर्यटन केंद्रेंची निर्मीती होत असल्यास अशा प्रकल्पांना आपली काहीच हरकत नाही. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल तसेच रोजागर निर्मिती ही होईल त्यामुळे असे अशोक चव्हाण म्हणाले.

Leave a Comment