विष्णू रूपात धोनी- अटक वॉरंट जारी

dhoni
दिल्ली – बिझिनेस टुडे या मासिकाच्या एप्रिलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अंकात भारताच्या क्रिकेट टीमचा कप्तान महेंद्र्रसिंग धोनीच्या विष्णुरूपातील मुखपृष्ठामुळे त्याच्या समोरच्या अडचणी चांगल्याच वाढल्या असल्याचे समजते. या प्रकरणी आंध्रपदेशातील अनंतपूर जिल्हा न्यायालयाने धोनीविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

या संबंधीची हकीकत अशी की या मासिकाच्या अंकात धोनीचा विष्णूरूपातील फोटो मुखपृष्ठावर छापला गेला आहे. धोनी ज्या ज्या उत्पादनांच्या जाहिराती करतो ती उत्पादने विष्णूंच्या आठ हातांत दाखविली गेली आहेत. विशेष म्हणजे यात एका हातात चप्पलही आहे. यामुळे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य श्यामसुंदर यांनी धोनी विरोधात हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्ल दावा दाखल केला. फेब्रुवारीत हा दावा दाखल झाला व त्यानंतर न्यायालयाने धोनीला ३ वेळा कोर्टात हजर होण्याचे आदेश देऊनही धोनी उपस्थित राहिला नाही. अखेर न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

Leave a Comment