काँग्रेसच्या कर्माची फळे आमच्या वाटेला – पवार

pwar
मुंबई – काँग्रेसवर जनता नाराज असून, त्यांनी केलेल्या कर्माची फळे राष्ट्रवादीच्या वाटेला आल्याची टीका आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत केली.

पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पवार म्हणाले की, राज्यात जनता काँग्रेसवर नाराज आहे. त्या नाराजीचा फटका राष्ट्रवादीला बसत आहे. विधानसभेसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. कार्यकर्त्यांमुळेच राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले. तसेच त्यांनी यावेळी रेल्वे दरवाढीलाही विरोध दर्शवला. महागाईच्या प्रश्नावर गुरूवारी ठाम भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यंदा कमी पाऊस पडल्याने महाराष्ट्रावर संकट आले आहे. दुष्काळ निवारण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment