विंबल्डन स्पर्धांवर अल कायदाचे सावट

WIMBLEDON
विंबल्डन- ब्रिटनमध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या विंबल्डन स्पर्धांवर अल कायदाकडून हल्ले होण्याचा धोका असून ब्रिटन पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. सिरीया आणि इराकमध्ये बंडखोरांना पाठिंबा देणार्‍या अल कायदाने हा संघर्ष ब्रिटनपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून विंबल्डन स्पर्धांदरम्यान बॉम्बस्फोटासारख्या घटना घडवून आणल्या जातील असे ब्रिटनच्या गुप्तचर विभागाला समजले आहे.

या स्पर्धेसाठी जगभरातील नामवंत खेळाडू येतात तसेच जगभरातून मोठ्या संख्येने प्रेक्षकही येतात. अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या या स्पर्धांच्या उद्घाटन आणि समारोप समारंभाला कलाकार, राजकीय नेते तसेच शाही कुटुंबातील सदस्यही उपस्थित राहतात. दोन आठवडे चालणार्‍या या स्पर्धांना अल कायदा कडून धोका असल्याने येथील सुरक्षा वाढविली गेली असल्याचे समजते.

Leave a Comment