इक्वाडोरने होंडुरासवर २-१ ने विजय

ekveder

क्युरिटीबा – फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ग्रुप ई मधील दुस-या सामन्यात इक्वाडोरने होंडुरासवर २-१ ने विजय मिळवला. या विजयामुळे इक्वेसडरला या स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवता आले आहे. इक्वाडोरच्या विजयाचा नायक इनेर वेलेंसिया ठरला.त्याने या सामन्यात गोल केल्याने इक्वेेडरला सहज विजय मिळविता आला.

या सामन्याीत वेलेंसियाने केलेले दोन गोल इक्वाडोरच्या विजयात निर्णायक ठरले. या सामन्यात होंडुरासने पहिला गोल केला होता. सामन्याच्या ३१ व्या मिनिटाला कार्लो कोस्टलीने गोल डागत होंडुरासला आघाडी मिळवून दिली. होंडुरासचा हा आघाडीचा आनंद फार काळ टिकला नाही.लगेचच तीन मिनिटांनी वेलेंसियाने मैदानी गोल डागत इक्वाडोरला बरोबरी साधून दिली. त्यानंतर सामन्याच्या ६५ व्या मिनिटाला वॉल्टर आयोवीच्या फ्रि किकवर वेलेंसियाने हेडरव्दारे सुरेख गोल करत इक्वाडोरला २-१ ने आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवत इक्वाडोरने हा सामना जिंकला.

ग्रुप ई मध्ये फ्रान्स सहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. स्विर्त्झलंड आणि इक्वाडोरचे समसमान तीन गुण आहेत. मात्र गोल संख्येच्या आधारावर इक्वाडोर दुस-या स्थानावर आहे. सलग दोन सामने गमावल्यामुळे होंडुरासचे स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा आहे.इक्वाडोरचा फ्रान्स विरुध्दचा सामना बाकी आहे. या सामन्यात इनेर वेलेंसियाला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

Leave a Comment