कॅम्पाकोला रहिवाशांच्या विरोधात गुन्हा दाखल

campacola
मुंबई – कॅम्पाकोल कम्पाउंडमधील रहिवाशांविरोधात महापालिकेच्या पथकाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यापासून रोखल्याबद्द्ल महापालिकेने वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कॅम्पाकोला कम्पाउंडमधील अनधिकृत घरांवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला रहिवाशांनी इमारतीच्या प्रवेशव्दारावरच रोखले होते.

या संपूर्ण घटनेचे महापालिकेने व्हिडीओ चित्रीकरण केले असून, तक्रार दाखल करताना पालिकेने हे चित्रीकरणही पोलिसांना दिले आहे. वरळी पोलिसांनी रहिवाशांविरोधात १४३ आणि १५३ या दोन कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ फुटेज तपासून दोषींविरोधात कारवाई करु असे पोलिसांनी सांगितले आहे.

शुक्रवारी कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी गॅस आणि वीज तोडणीसाठी आलेल्या पालिकेच्या पथकाला प्रवेशव्दारावरच रोखल्याने पालिका अधिका-यांना कारवाई करता आली नव्हती. बळाचा वापर करण्यापूर्वी पालिका अधिकारी पुन्हा एकदा घरे रिकामी करण्यासाठी रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. दरम्यान शनिवारी कॅम्पा कोलाच्या आसपासचा बंदोबस्त पोलिसांनी कमी केल्यामुळे आज कारवाई होण्याची शक्यता कमी आहे.

Leave a Comment