
वॉशिंग्टन – गुजरातमधील 2002 च्या भीषण दंगलीचे कारण पुढे करून अमेरिका कायमच नरेंद्र मोदींना व्हिसा नाकारत आली मात्र ते पंतप्रधान होताच भारताचे पंतप्रधान म्हणून व्हिसा मंजूर करणाऱ्या अमेरिकेने मोदींना आमंत्रण दिले आहे पण मोदींनी अमेरिकेला प्राधान्य न देता अन्य देशांना भेटी दिल्याने आता अमेरिका ताळ्यावर आली आहे त्यात नरेंद्र मोदींना अमेरिकी खासदारांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात खास निमंत्रित म्हणून भाषण देण्यासाठी बोलावण्याची मागणी केली आहे .
मोदींसाठी सरसावले अमेरिकन खासदार !
अमेरिकी संसद म्हणजे यूएस काँग्रेस दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत भाषण करण्यासाठी नरेंद्र मोदींना आमंत्रित करावे अशी मागणी अमेरिकी खासदारांनी केली आहे . नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. अमेरिकी काँग्रेसच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष आणि कॅलिफोर्नियाचे रिपब्लिकन खासदार एड रॉयस यांनी मागणी केली. काँग्रेसच्या प्रतिनिधीगृहाचे स्पीकर जॉन बोएनेर यांना लिहिलेल्या पत्रात रॉयस यांनी मोदींना अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत बोलावण्याची मागणी केली आहे .
खासदार रॉयस यांनी स्पीकरना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राजकीय, आर्थिक आणि सामरिक अशा सर्वच अर्थाने भारत हा अमेरिकेचा सर्वात विश्वासू साथीदार आहे. 21 व्या शतकात भारतासारखा अन्य कोणीही मित्र देश अमेरिकेला मिळणार नाही. रॉयस यांच्याप्रमाणेच नॉर्थ कॅरोलीनाचे रिपब्लिकन खासदार जॉर्ज होल्डिंग यांचीही स्वाक्षरी असलेल्या या पत्राला स्पीकर बोएनेर यांनी अजून कोणतेही उत्तर दिलेले नाही.1998 च्या अमेरिकी कायद्याप्रमाणे 2005 मध्ये तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्लू बुश यांच्या प्रशासनाने नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीसाठी व्हिसा नाकारला होता. त्यासाठी 2002 च्या भीषण दंगली रोखण्यात आलेले अपयश हे कारण अमेरिका वारंवार देत आली असली तरी आज चित्र बदलले आहे .
