बसपाशी कोणतीही मैत्री नाही ;शरद पवार

sharad-pawar
मुंबई – लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि मनसेपेक्षा अधिक मते घेणाऱ्या बहुजन समाजवादी पक्षाबरोबर राष्ट्रवादी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करेल ही चर्चा बसपाकडून फेटाळण्यात आली असली तरी खुद्द शरद पवार यांनीही बसपाशी कोणतीही मैत्री होणार नाही असे वक्तव्य करून चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस बसपसोबत आघाडी करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून माध्यमांत रंगली आहे. याच आघाडीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बसपच्या अध्यक्षा मायावतींना भेटणार असल्याचेही बोलले जात होते.मात्र आज या सर्व तर्क-वितर्कांचे खंडन करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, विधानसभा निवडणूकीत बसप सोबत आघाडी होण्याची कोणतीही शक्यता नाहीच. कालच बसपनेही आपण विधानसभा स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे.

केवळ दलितांची मते मिळवण्यासाठीच बसपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करणार असल्याची चर्चा घडवून आणण्यात येत असल्याचेही बसपच्या एका नेत्याने काल म्हटले होते. लोकसभा निवडणुकीत बसपला राज्यात आप आणि मनसेपेक्षा जास्त प्रतिसाद मतदारांनी दिला असला तरी राष्ट्रवादी बसपाशी युती करणार नाही ,अशी भूमिका पवारांनी जाहीर केली आहे.

Leave a Comment