आता ट्विटरवर करा `लाईव्ह व्हिडिओ` शेअर

twitter
आपल्या यूजर्सना एक नवीन आणि महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तयारीत सोशल वेबसाईट ट्विटर आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही लाईव्ह व्हिडिओ किंवा एखाद एडिट व्हिडिओ या झटपट तुमच्या फॉलोअर्ससोबत शेअर करू शकता.

व्हिडिओ शेअरिंग आणि एडिंटींग प्लॅटफॉर्म असलेले ‘स्नॅप्पीटीव्ही’ खरेदी ट्विटरने केले आहे. हा व्यवहार नेमका किती रुपयांना झाला हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.

2010 मध्ये ‘स्नॅप्पीटिव्ही’चा जन्म झाला. या टेक्नॉलॉजीचा मीडिया तसंच वेगवेगळ्या ब्रँन्डशी जोडलेल्या कंपनींना मोठ्या प्रमाणावर झाला. यामुळे, ‘रिअल टाईम ब्रॉडकास्ट क्लिप’ म्हणजेच लाईव्ह फुटेज एडिट करणं आणि लगेचच ते इतरांशी शेअर करणे शक्य झाले. या टेक्नॉलॉजीमुळे ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर हे फुटेज पाहणे शक्य होते.

ट्विटरने ही सुविधा अंमलात आणल्यानंतर, हीच टेक्नॉलॉजी वापरून स्पोर्टस् मॅचचे हायलाईटस क्षण लगेचच दाखवता येणंही शक्य होणार आहे. तसेच ब्रेकिंग न्यूजही लगेचच दाखवले जाऊ शकेल. आपले आवडते क्षणही तुम्हाला लगोलग शेअर करता येतील.

सध्या व्हिडिओ सेगमेंटमध्ये ‘ट्विटर बरीच गुंतवणूक करत आहे. ट्विटरचे डायरेक्टर (प्रोडक्ट मॅनेजमेंट) बलजीत सिंह यांनीही या बातमीला दुजोरा देत सांगितले टीव्ही ब्रॉडकास्ट, बिझनेस आणि इव्हेंट प्रोड्युसर्सना झटपट हाय क्वालिटी व्हिडिओ शेअर करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देणे आता आमच्यासाठी महत्त्वाचे आहे’.

तसेच, ‘ट्विटरसोबत आम्ही लाईव्ह कव्हरेजसाठी ओपन प्लॅटफॉर्म अविरत सुरु ठेऊ’ असे स्नॅप्पीटिव्हीकडून स्पष्ट करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर व्हिडिओ आणि फोटोवर जास्त लक्ष देत आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरनं अँन्ड्रॉईड, आयफोन आणि वेबवर GIF फॉरमॅटदेखील उपलब्ध करून दिला आहे.

Leave a Comment