हत्ती नाही देणार घड्याळाला साथ

combo
मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आगामी विधानसभेसाठी बहुजन समाज पक्ष आघाडी करणार नसल्याचे पक्षातर्फे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. बसपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सुरेश माने यांनी बसप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आघाडीबाबतची माहिती अफवाच असल्याचे सांगितले. बसप विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस केवळ दलितांची मते मिळवण्यासाठीच बसपसोबत आघाडी करणार असल्याची चर्चा घडवून आणण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

बसपच्या प्रमुख मायावती यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भेट घेणार होते. त्या पार्श्वभूमीवर बसप आणि राष्ट्रवादी आघाडी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, बसपने ती फेटाळून लावली. लोकसभा निवडणुकीत बसपला राज्यात आप आणि मनसेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत बसप काय करणार याकडे लक्ष होते.