जागतिक रॅपिड बुध्दीबळ स्पर्धेत आनंदला कास्यपदक

viswanathan-anand
दुबई – भारताचा अव्वल बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंदने जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. मात्र कार्लसनला पराभूत करुनही, आनंदला जागतिक रॅपिड बुध्दीबळ स्पर्धेमध्ये कास्यपदकावर समाधान मानावे लागले तर, कार्लसनला सुवर्णपदक मिळाले.

कार्लसनला पराभूत होऊनही स्पर्धेच्या गुणांकन पध्दतीमुळे सुवर्णपदक जिंकता आले. कार्लसनने पंधरापैकी सर्वाधिक अकरा गुण मिळवले. आनंद, फॅबियानो कारऊना आणि अलेक्झांडर मोरोझेवीच हे संयुक्तपणे १०.५ गुणांसह दुस-या स्थानावर होते, मात्र टायब्रेकमध्ये इटलीच्या फॅबियानोची आनंदपेक्षा सरस कामगिरी असल्याने त्याला रौप्य पदक मिळाले तर, आनंदने रशियाच्या मोरोझोवीचवर मात करत कास्यपदक पटकावले. कार्लसनला पराभूत केल्यानंतरचे आनंदचे तीन्ही सामने ड्रॉ झाले होते. याउलट कार्लसनला फक्त आनंदकडून पराभव स्वीकारावा लागला. कार्लसनने आठ विजय मिळवताना, सहा सामने ड्रॉ झाले त्यामुळे कार्लसन सुवर्णपदक मिळाले.

Leave a Comment